संत नामदेवांचे अभंग मनास उपदेश

Manaas Updesh : Sant Namdev Ji

मनास उपदेश
1

अरे अलगटा माझिया तूं मना । किती रानोराना हिंड-विसी ॥१॥
विठोबाचे पायीं दृढ घालीं मिठी । कां होसी हिंपुटी वांयां-विण ॥२॥
क्रिया कर्म धर्म तुज काय चाड । जवळी असतां गोड प्रेमसुख ॥३॥
संकल्प विकल्प सांडीं तूं समूळ । राहेंरे निश्चळ क्षणभरी ॥४॥
आपुलें निजहित जाणतूं त्वरित । वासनारहित होईं वेगीं ॥५॥
नामा ह्मणे तुज ठायींचें कळतें । सोसणें कां लागतें गर्भवास ॥६॥

2

दाही दिशा मना धांवसीं तूं सईरा । न चुकती येरझारा कल्पकोटी ॥१॥
विठोबाचे नामीं दृढ धरीं भाव । तेर सांडीं वाव मृगजळ ॥२॥
भुक्तिमुक्ति सिद्धि जोडोनियां कर । करिति निरं-तर वळगणें ॥३॥
नामा ह्मणे मना धरीं तूं विश्वास । मग गर्भवास नहे तुज ॥४॥

3

अरे मना तूं मर्कटा । पापिया चांडाळा लंपटा ।
परद्वार हिंडसी सुनटा । अरे पापी चांडाळा ॥१॥
अरे तुज पापावरी बहु-गोडी । देवाधर्मीं नाहीं आवडी ।
तेणें न पावसी पैल थडी । कर्म बांधवडी पडिसील ॥२॥
अरे तूं अभिलषिसी परमारी । तेणें सिद्ध-पंठ राहेल दुरी ।
जवळी येईल यमपुरी । आपदा पावसील ॥३॥
आतां तुज वाटतसे गोड । अंतकाळी जाईल जड ।
महादोष येति सुखा आड । करितील कईवाड यमदूत ॥४॥
माझें शिकविलें नाइ-कसी । आतां सांगेम बळिया केशवासी ।
धरूनि नेईल वैकुंठासी । चरणीं जडसी ह्मणे नामा ॥५॥

4

हें गे आयुष्य हातोहातीं गेलें । आंगीं आदळलें जन्म-मरण ॥१॥
कांरे निजसुरा दैवहत मना । आपुली सूचना न करिसी ॥२॥
कांरे तुज भ्रांति पडलीसे मूढा । वेढी चहूंकडा काळ सैन्य ॥३॥
नानारोगें तुझी काया वेधियेली । नरकाचीं भरलीं नवही द्वारें ॥४॥
पाळलीं पोशिलीं आप्त माझीं सखीं । अंतीं तुज पारखी होती जाण ॥५॥
नामा ह्मणे तुज ह्मणे तुज येतों लोटांगण । तारील नारायण भरंशानें ॥६॥

5

उत्कंठित तप एक विठ्ठल नाम । आतां क्रियाकर्म कोणालागीं ॥१॥
राहेंरे तूं मना राहेंरे निवांत । ध्यायीं अखंडित नारा-यण ॥२॥
संतसमागमें साथीं हें साधन । पावसी निर्वाण नित्य सुख ॥३॥
नामा ह्मणे तूं सहज सुखरूप । होऊनि निर्विकल्प विचारी पां ॥४॥

6

क्षण एक मना बैसोनि एकांतीं । विचारीं विश्रांति कोठें आहे ॥१॥
लक्षचौर्‍यांशींच्या करितां येरझारा । शिणलसि गव्हारा वेळोवेळां ॥२॥
अझूनितुज लाज न वाट पैं कैसी । नर-काचे द्वारांसि जावें किती ॥३॥
दुर्लभ आयुष्य मनुष्य देहिंचें । जातसे मोलाचें वांयांविण ॥४॥
खापराचे साठीं सांडिला परिस । गहिंवरें फुटतसे ह्लदय माझें ॥५॥
पुत्रकलत्रादिक सुखाचीं सोयरीं । त्यांची ममता थोरी धरिली तुबां ॥६॥
अनुदिनीं पाळितां अनुभवेंचि पाहे । कोण सुख आहे तयाजवळीं ॥७॥
जगाचा जीवलग मायबाप आपुला । तो तुवां दुराविला कोशिराज ॥८॥
स्वप्रींचिया धना लुब्ध-लसि काय । आलें काळभय हाकित तुज ॥९॥
संतापाचें सदन शोकाचे पुतळे । ते त्वां मानियले हितकारी ॥१०॥
कैंची सुख निद्रा इंगळचि शेजे । प्रत्यया आणूनि तुझें तूंचि पाहीं ॥११॥
तुज राखेल कोण येवढिये संकटीं । रिघसी ज्याचे पोटीं मरणाभेणें ॥१२॥
आ-दिमध्य अवसानीं सोडविल निर्वाणीं । तया चक्रपाणी सेविं वेगीं ॥१३॥
जो जो क्षण लविसी हरिभजनाकडे । तो तो गांठीं पडे सार्थकीं रे ॥१४॥
नामा ह्मणे तुजचि येतों कत्कुळती । सोडिंरे संगती वासनेची ॥१५॥

7

वासनेची करणी ऐकें तूं मना । या केली रचना ब्रह्मांडाची ॥१॥
निर्गुण चैतन्य सदा सुखरासी । त्या दिल्ही चौ-र्‍यांशीं लक्ष सोंगें ॥२॥
ऐसो हे लाघवी खेळे नाना खेळ । तेथें तूं दुर्बळ काय करिसी ॥३॥
क्षण एक चंचळ क्षण एक निश्चळ । क्षण एक विफळ सावध करी ॥४॥
क्षण एक कृपाळ क्षण एक निष्ठुर । क्षण एक उदार कृपण करी ॥५॥
क्षण एक सात्विक क्षण एक राजस । क्षण एक तामस करोनि सांडीं ॥६॥
क्षण एक प्रवृत्ति क्षण एक निवृत्ति । क्षण एक विश्रांति तप्त कर ॥७॥
क्षण एक आवडे क्षण एक नावडे । क्षण एक विघडे घडलें सुख ॥८॥
ऐसी हे लाघवी पा-हतां क्षणभंगुर । ब्रह्मादि हरिहर ठकिले जेणें ॥९॥
नामा म्हणे तरीच इचा संग तुटे । दैवयोगें भेते संतसंग ॥१०॥

8

वेदीं तोचि शास्त्रीं सर्वांठायीं तोचि । पुराणांत तोचि अंत:करणीं ॥१॥
नाम सदा ध्यायीं नाम सदा ध्यायीं । रामनाम ध्यायीं अरे मना ॥२॥
नामा म्हणे देह नाहीं पुनरुपें । केशवनाम सोपें उच्चारीं बापा ॥३॥

9

धरींरे मना तूं विश्वास या नामीं । अखंड रामनामीं ओळखी धरीं ॥१॥
जप करीं अखंद खंडेना । निशिदिनीं मना होय जागा ॥२॥
नामा म्हणे मना होईं रामरूप । अखंडित जप सोहं सोहं ॥३॥

10

प्रेमामृत सरिता पवित्र हरिकथा । त्रिभुवनींच्या तीर्थां मुगुटमणि ॥१॥
तेथें माझ्या मना होईं क्षेत्रवासी । राहें संतांपाशीं सुख घेतां ॥२॥
ऐहिक्य परत्र दोन्हीं समतीरीं । परमानंदलहरी झेंपावत ॥३॥
मुक्तांचें जीवन मुमुक्षा माउली । शिणल्या साउली विषयासक्तीं ॥४॥
परमहंसकुळ सनकादिक सकळ । राहिले निश्चळ करोनि नित्त ॥५॥
नामा म्हणे मना सोइरे हरिजन । तारक त्याचें चरण दृढ घरीं ॥६॥

11

अरे मना शोक करिसी किती । हे तंव वांयां धनसंपति ।
आयुष्य भविष्य नाहीं तुझिये हातीं । हें अवघें अंतीं जायजणें ॥१॥
एक अर्बुद साठीं कोटि देखा । तीस लक्ष दहा सहस्त्र लेखा ।
सात शतें नवमास मापा । तया हिरण्यकश्यपा काय झालें ॥२॥
चौदा चौकडय लंकानाथा । नव्याण्णव सहस्त्र राया दशरथा ।
तेही गेले स्वर्गपंथा । मागें सर्वथा नुरलेचि ॥३॥
चौदा कल्प मार्कंडेया पडे । तैं लोमहर्षणाचा एक रोम झडे ।
बकदालभ्याचे पुरे निमिषें मोडे । गेले येवढे अरे मना ॥४॥
बकदालभ्याचे पुरे निमिषें । तें वटहंसाचें उपडे पिच्छ ।
तयासि होता मत्युप्रवेश । तो एक श्वास भृंशुडीचा ॥५॥
मरणांत पुरे भृंशुडीचा । तैं एक दिवस कूर्माचा ।
नामा वि-नवी केशवाचा । वेगीं विठोबाचा पंथ धर ॥६॥

12

गणपति पूजिली ते दोंदिल भले । वैष्णव न भले अरे मनी ॥१॥
सीतळा पूजिली ते ह्मइसे भले । वैष्णव न भले अरे मनी ॥२॥
मैराळ पूजिले ते वाघे भले । वैष्णव न भले अरे मनी ॥३॥
सूर्य पूजिले ते घोडे भले । वैष्णव न भले अरे मनी ॥४॥
नामा ह्मणे जे कां विठ्ठलीं भजिले । ते वैष्णव भले सत्य मना ॥५॥

13

धांवत धांवत जाईन वोरसे । दाटला उल्हासें कंठ माझा ॥१॥
अंतरींचें गुज सांगेन आपुलें । ह्लदयीं दाटले प्रेमअश्रु ॥२॥
पीतांबर छाया करूनि भक्तांसी । सांगेन मी खती तयापुढें ॥३॥
संतसमागमें दावीं कवतुकें । पाठवी भातुकें देऊनियां ॥४॥
नामा म्हणे मज आहे भरंवसा । मना तूं विश्वास दृढ धरीं ॥५॥

14

नको नको मना हिंडों दारोदारीं । कष्ट झाले भारी वांयांविण ॥१॥
कल्पना सांडोनि संतासंगें राहीं । सर्व त्यांचे पायीं सुख आहे ॥२॥
ज्याचिया दर्शनें शोक मोह जळे । पाप ताप पळे कळभय ॥३॥
जवळीच देखती पायाळावांचून । तें सुख निधान वैकुंठींचें ॥४॥
नामा ह्मणे आली शेवटील घडी । तों वईं आवडी हाचि एक ॥५॥

15

धणीवरी ध्यान करीं कांरे मना । या सुख निधाना विठोबाच्या ॥१॥
पंढरीये-तैसें सुख आहे त्याचे पायीं । अनुसरोनि राहीं एकवेळ ॥२॥
श्रीमुख साजिरें पाहीं दृष्टिभरी । जीवित्वाचें करीं निंबलोण ॥३॥
जेणें लक्ष धरोनि आहे पुंडलीक । तोचि भाव एक दृढ धरीं ॥४॥
नलगे गुरुमंत्र नलगे जप तप । उघडें स्वरूप विटेवरी ॥५॥
नामा ह्मणे जरी निकत संतचरन । तरीच प्रेमखून पावसील ॥६॥

16

पृथ्वी ध्यासी तरी पृथ्वीचि होसी । केशव न होसि अरे मना ॥१॥
आप ध्यासी तरी आपचि होसी । केशव न होसि अरे मना ॥२॥
वायु ध्यासि तरी वायुचि होसी । परी के शव न होसि अरे मना ॥३॥
आकाश ध्यासी तरी आकाशचि होसी । परी केशव न होसि अरे मना ॥४॥
नामा ह्मणे जरी केशवासी ध्यासी । तरी केशवचि होसी अरे मना ॥५॥

17

संसारीं असतां जीवन्मुक्त आह्मी । विठ्ठल हे नामीं वि-नटलें ॥१॥
काया क्लेश करणें शरीर दंडणें । न लगे हिंडणें दाही दिशा ॥२॥
कोव वाहे मंत्र वाउगी खटपट । गाऊं निष्कपट रामनाम ॥३॥
नामा ह्मणे मज आहे हा भरंवसा । मना तूम विश्वासा दृढ धरी ॥४॥

18

देवा तुझें मी चाटारु । सहस्त्रा एका हाकीं करूम ।
लाभ होतसे अपारु । धडी धडीये माझारी ॥१॥
काया क्लेश करणें शरीर दंडणें । न लगे हिंडनें दही दिशा ॥२॥
कोण वाहे मंत्र वाउगी खटपट । गाऊं निष्कपत रामनाम ॥३॥
नामा ह्मणे मज आहे हा भरंवसा । मना तूम विश्वासा दृढ धरीं ॥४॥

19

देवा तुझें मी चाटारु । सहस्त्रा एका हाकीं करूं ।
लाभ होतसे अपारु । धडी धडीये माझारी ॥१॥
तुझ्या पायांची जोडी । त्यासि होतसे परवडी ।
आवारु न लाहे एक घडी । नंदप्रिय होतसे ॥२॥
मुदल पुसतसे वेळोवेळां । हा मनारे पापी चांडाळा ।
सांग चोविसां आगळा । कवणेपरी न धाय ॥३॥
वासना मागतसे तुज । हे द्यावी जी मज ।
दाटणी होतसे सहज । ह्मणवोनि मज अंकी-तसे ॥४॥
नामा म्हणे जी दातारा । तुझिये भेटी सारंगधरा ।
लाभ होतसे अपारा । घडी घडीये विठ्ठला ॥५॥

20

शोधोनियां चारी वेद । सार काढोनियां भेद ॥१॥
मना जाण जाण जाण । विठोबाची प्रेमखुण ॥२॥
साहि शास्त्रांचें संमत । मंथूनि काढिलें यथार्थ ॥३॥
याज्ञिकांची जीवनकळा । जन्मनीचा जो जिव्हाळा ॥४॥
नामा म्हणे माझे बापें । साधि-यलें संतकृपें ॥५॥

21

लाजों नको मना हरीच्या कीर्तना । संसार पाहुणा दो दिवसांचा ॥१॥
कंठीं नाहीं आइती ह्मणोनि सांडूं नको ज्योति । इतुकिये प्रांती पडूं नको ॥२॥
बाळकाचे बोल माउली प्रीति करी । तैसी कीर्ति हरी परिसे चित्तें ॥३॥
भलतिया परी बोले बा श्रीहरी । तो भवसागरीं तारील जाणा ॥४॥
येणें तारुण्यपणें भ्रमलसि झणीं । भोगिसी पतनी जन्मतरीं ॥५॥
तूं होय मागता हरि होय दाता । शरण जांई अनंता ह्मणे नामा ॥६॥

22

बोलिलें वेदांतीं ऐकिलें सिद्धांतीं । बोल नेति नेति अनिर्वाच्य ॥१॥
तोचि हा बोल बोलरे मना । बोल नारा -यणा समर्पावे ॥२॥
माझा मायबापें सोडवूनि गळा । केशवीं बांधला बोला बोल ॥३॥
नामा ह्मणे बोल बोलतांहि बोल । खेचरें दाविला प्रेमभक्ति ॥४॥

23

मन धांवे सौरावैरा । मन मारूनि केलें एकमोरा ॥१॥
मन केलें तैसें होय । मन धांवडिलें तेथें जाय ॥२॥
मन लांचावलें न राहे । तत्त्वीं बैसलें कधिं नव जाये ॥३॥
नामा म्हणे सोहं-शुद्धि । मन वेधलें गोविंदीं ॥४॥

24

सुख दु:ख जिवाचें सांगेन आपुलें । ह्लदय फुगलें फुटों पाहे ॥१॥
धरूनि पीतांबर नेईन एकांतीं । सांगेन जिवींची खंती तया पुढां ॥२॥
संतसमागमें खेळवील कौतुकें । प्रेमाचें भा-तुकें देऊनियां ॥३॥
अंतरींची आवडी तोचि जाणे एक । जिवलग जनक पंढरीरावो ॥४॥
नामा ह्मणे ऐसा आहे पैं भरंवसा । मना तूं विश्वासा दृढ धरीं ॥५॥

25

परब्रह्म विश्वाकारें अवतरलें भक्तिकाजा । मूर्ति सु-नीळु सांवळी केशिराजु स्वामी माझा ॥१॥
गोविंदारे तुझें ध्यान लागो मना । पाहिजे प्रेमपद निर्मळ होत ज्ञान ॥२॥
मन हें वोवरी असे सुमनाचे चित्रशाळी । दोन्ही चरण सुकुमारे वरीं अष्टदळ क-मळी ॥३॥
संध्याराग रातले सुनीळ दिशातळवटीं । ध्वज वज्रांकुश चिन्हें साजती गोमटीं ॥४॥
इंदिरा तिथें थोकली तिच्या सुखा नाहीं पारु । ते चरणीं स्थिर झाली ह्मणोनि ह्मणती लक्ष्मीवरु ॥५॥
घवघवीत वांकी चरणीं ब्रिदाचा तोडरु । नखप्रभा फांकली तिनें लोपला दिनकरु ॥६॥
सृष्टि घडीत मोडीत उत्पत्ति स्थिति प्रळय अवघें नवें । तो चतुर्मुख ब्रह्मा चरण पूजितो स्वभावें ॥७॥
देवा धिदेव शंभू कैलासींचा राणा । गंगा मुगुटीं धरिला तिचा जन्म अं-गुळीं चरणा ॥८॥
दैत्यकुळीं जन्मला देव पळती ज्याचेनि धाकें । पावो पाठीसी लागला ह्मणऊनि दारवंटा राखे ॥९॥
शेष वर्णितां श्रमला वेद परतले माघारीं । नामा ह्मणे अरे मना याचे चरण धरीं झडकरी ॥१०॥

26

मनाचें मनपण सांडितां रोकडें । अंतरींचें जोडे परब्रह्म ॥१॥
नाथिला प्रपंच धरोनियां जीवीं । सत्य तें नाठवीं कदाकाळीं ॥२॥
अझूनि तरी सांडीं नाथिलें लटिकें । तरसील कव-तुकें ह्मणे नामा ॥३॥

  • मुख्य पृष्ठ : संपूर्ण काव्य रचनाएँ : संत नामदेव जी
  • मुख्य पृष्ठ : हिन्दी कविता वेबसाइट (hindi-kavita.com)